Share

तीन वर्ष झाले तरी ‘या’ महामार्गाचे काम ‘जैसे थे’!

Published On: 

बीड: जिल्ह्यातील खरवंडी ते नवगण राजुरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम ३ वर्ष झाले तरी जसे होते तसेच आहे. अजूनही नागरिकांना रस्त्यांच्या समस्येला तोंड देत येथून प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रयत्नानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती मात्र या कासव गतीच्या कामामुळे तीन वर्ष झाले तरी रस्त्यावर खड्डे तसेच आहेत. या कामाच्या कंत्राटदाराला महामार्ग प्राधिकरण पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता खरंवडी ते नवगण राजूरी असा आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम हाती घेतल्याने त्यांच्या पुढाकारातून या रस्त्याला मंजूरी मिळाली. या कामाचे टेंडर होऊन हे काम ५ जून २०१८ रोजी प्रथमेश कन्स्ट्रक्शन आणि ए. सी. शेख कन्स्ट्रक्शनला मिळाले.

३६ किमीचा हा रस्ता डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होता. मात्र, ३ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप काम पूर्ण नाही. रस्त्याचे काम सध्या बंद आहे. कामाचा दर्जाची निकृष्ट असून डीएलसीमध्ये सिमेंटचे प्रमाण अनुज्ञेय प्रमाणापेक्षा कमी आहे. राष्ट्रीय महामार्गच्या गुणनियंत्रक पथकाकडून याची तपासणी आवश्यक आहे. तर, अॅथॉरिटी इंजिनिअर व संबंधित खात्याचे या रस्ता कामाच्या प्रगती व गुणत्तेकडे साफ दूर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!