औरंगाबाद : आरटीई अंतर्गत शासनाने ५० कोटी रुपये देण्याचा शासन आदेश काढला आहे. यावर इंग्रजी शाळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने सोमवारी (दि.५) सकाळी चेलीपुरा हायस्कूल येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी करून आरटीई फी परतावा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
मागील वर्षभरापासून राज्यातील साडेसहा लाख शिक्षक व दीड लाख शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आहे. उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही शिक्षक भाजीपाला विकतात, काही हातगाडीवर सॅनिटायझर तर काहींनी वडापावचे गाडे सुरु करण्याची वेळ आली. तरीही काही यंत्रणा माहीत नसतांना वर्षभर मुलांना ऑनलाईन शिकवले.
परंतु पालक फी भरत नाही आणि सरकार लक्ष देत नाही. म्हणून सरकारने यांना मानधन दिले पाहिजे, तसेच शासनाने आरटीईचा फी परतावा साडे अठराशे कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने केवळ ५० कोटी रुपयांचा फी परतावा देण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी मेस्टाचे अध्यक्ष संजयराव तायडे, मनीष हंडे, राजीव नगरकर, प्रवीण अग्रवाल, एस.एन.नायर, नवनाथ पवार, नानासाहेब परभने, प्रवीण सरकटे, डॉ. गजानन नालमवार सह आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक! कोरोनाबाधितांमध्ये लहान बालकांचे प्रमाण वाढले
- आणि म्हणे शिवसेनेचा भगवा फडकला?महाराष्ट्रात महावसुलीचे सरकार आहे; उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कोठे आहे? – रविशंकर प्रसाद
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिलाच पाहिजे : रामदास आठवले
- पंढरपूर पोटनिवडणूक : रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे यांची गुप्त बैठक
- देशमुख दिल्लीला रवाना; आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार की फक्त ‘त्या’ नेत्याची भेट घेणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
