Share

पंढरपूर पोटनिवडणूक : रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे यांची गुप्त बैठक

Published On: 

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

दिवसेंदिवस या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार असल्याने या दोन पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

पोटनिवडणुकीतील प्रचारसभांबरोबरच आता नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरु झालं आहे. निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असताना आता मतदारसंघातील दोन बड्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन नेते कुण्या एका पक्षाचे नाहीत तर राष्ट्रवादी आणि भाजपचे आहेत. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकं काय शिजलं? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे आणि माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक झाल्याची सध्या मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही बैठक कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडल्याचीही चर्चा सुरु आहे. आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे समाधान आवताडे यांच्या प्रचारात सक्रीय आहेत. यामुळे या दोघांच्या गुप्त बैठकीमुळे अनेक राजकीय चर्चेला उधान आलेले आहे.

या दोन बड्या नेत्यांमध्ये या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ? असा प्रश्न सध्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पडलेला आहे. या बैठकीत नेमकं काय शिजलं आणि त्याचे परिणाम काय होणार कि या भेटीमुळे स्थानिक राजकरणामध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!