Share

चिंताजनक! कोरोनाबाधितांमध्ये लहान बालकांचे प्रमाण वाढले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधितांमध्ये बालकांचे प्रमाणही वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठ दिवसांत शहरात एकूण ७४ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन बालकांचा मृत्यु झाला आहे. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दुसरीकडे शहरात रस्त्यांवर फिरणारा युवावर्ग अधिक असून एकूण बांधितात त्यांचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत पोहचले आहे.

औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रोजचे दिड हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत असल्याने त्यांच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. यातच आरोग्य तज्ज्ञांनी शहरात कोरोनाचा नवीन स्टे्रन सुरू झाल्याचे स्पष्ट केले असून यात बालकांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान मागील पंधरा दिवसांत कोरोनाबाधितांतून बालकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात झालेल्या बालकांच्या मृत्युपैकी त्यात शहरातील दोन बालकांचा समावेश आहे. मागील वर्षभरात शहरात बाधित झालेल्या बालकांपैकी एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र आता बालकांचाही मृत्यु होऊ लागल्याने आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पालिकेकडून प्राप्त अहवालानुसार २७ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील औरंगाबाद शहरात ७४ बालके कोरोनाने बाधित झाली आहेत.

बाधितांत बालकांचे हे प्रमाण वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात कमी दिसत असले तरी चिंता वाढवणारे आहे. कारण, लहान मुलांवरील उपचार पद्धती आव्हान देणारी आहे. त्यामुळे आई वडिलांनी बालकांची विशेष काळजी घेणे, हाच एकमेव चांगला उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!