Share

…आणि म्हणे शिवसेनेचा भगवा फडकला?

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असा दावा करण्यात आलाय. नवनिर्वाचीत अध्यक्ष नितीन पाटील यांनी नुकतेच शिवबंधन बांधल्याने हा दावा, खराही आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या निवड प्रक्रियेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित नेत्यांकडे पाहिले तर हा ‘शिवसेनेचा भगवा’ म्हणावा का? असा प्रश्न पडतो.

या पत्रकार परिषदेला डावीकडून उपस्थित नेत्यांमध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष नितीन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या बाजूला काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे, शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह नाव घेता येईल असा, जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता. अशा सर्व परिस्थितीत जिल्हा बँकेवर शिवसेनेची सत्ता आली का? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते.

जिल्हा बँक निवडणुकीचा निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतरही जिल्हा बँकेची सत्ता कायम ठेवण्यात पाटील कुटुंबियांना यश आले. सुरेश पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँकेची जबाबदारी त्यांचे पुत्र नितीन पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेले काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील आधी भाजप आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झाले. त्याच वेळी पुन्हा अध्यक्षपदी नितीन पाटील यांची वर्णी लागेल याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!