हैद्राबाद : महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण तापलं आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आले होते.
योगी आदित्यनाथांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले.यानंतर योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
‘भाजपनं या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावलंय की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. त्यांना लाख लाख वेळा मला जिन्ना म्हणावं. पण आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रजाकार होते, ते पाकिस्तानात गेले आणि जे प्रामाणिक होते, ते हैदराबादमध्येच राहिले,’ असं ओवेसी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘रावसाहेब दानवे शुद्ध तुपातले आहेत का?’; ईडी चौकशीवरून बच्चू कडूंचा सवाल
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- ‘पुणेकरांनी बनवलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये’ : सुप्रिया सुळे
- धक्कादायक : सद्यस्थितीत भारतातील 70% कोरोनाचे सक्रीय रुग्ण ‘या’ राज्यांमधून
- ‘हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार’ : योगी आदित्यनाथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
