Share

औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी मदत केंद्राची स्थापना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच रुग्णांना रेमिडिसिवीर इजेक्शनची खुप मोठी मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

या मध्ये शहरासह जिल्हाभरातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करुन रुग्णांची वर्गवारी करुन उपलब्ध रेमिडिसिविर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. या बाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनास सादर करणे बंधनकारक केले आहे. ज्या खासगी रुग्णालयांना रेमिडिसिविरची आवश्यकता आहे. त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर अर्जाव्दारे  जिल्हाधिकारी मदत कक्षात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ( ०२४० – २३३१२००) तसेच अन्न  व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक बजाज ९४२२४९६९४१ यांच्या व्हॉट्सअॅपवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या अर्जानुसार अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत  तपासणी करुन त्यानंतर घाटीच्या औषध विभागामध्ये पात्र पाठवण्यात येणार आहेत. त्यातील गरजुंना रुग्णालयांना डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्याकडून रेमिडिविर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोणत्याही नागरिकांनी वैयक्तिकरित्या या इजेक्शनची मागणी करु नये. त्यावर याेग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!