Share

मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांच्या मागणीची तरी दखल घ्यावी-प्रसाद लाड

Published On: 

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून या विरोधात एनआयए आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्याला उत्तर देतांना भाजप नेते प्रसाद लाड यांनीही तशी मागणी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख मंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीची दखल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असे लाड यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्या मागणीचे स्वागत करतो आणि तशी चौकशी करण्याची विनंती करतो, असेही लाड म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच स्थानिक पोलिसांकडून चौकशी न करता थेट केंद्रीय संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एनआयए, ईडी आणि सिबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी लाड यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!