Share

औरंगाबादेतील शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारा; इम्तियाज जलील यांची मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारल्यास गोरगरीब महिला रुग्णांना विविध आजारावर वेळेवर उपचार मिळेल व गरोदर महिलांची प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक होण्यास मदत होईल त्याकरिता त्वरीत रुग्णालय उभारण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख(Amit Deshmukh) यांच्याकडे केली आहे. त्यांनी शाहगंज येथे स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

औरंगाबाद येथील मुख्यबाजारपेठ व भरगच्च नागरी वसाहतींच्या मध्यभाग असलेला शहागंज येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने या केंद्रात फक्त ओपीडी सुरु असुन तेथे गोरगरीब रुग्णांना प्रथमोपचार वैद्यकीय सेवा दिली जाते. याठिकाणी उपचाराकरिता दररोज येणाऱ्या रुग्णांमध्ये विविध आजाराने ग्रस्त महिलांचे प्रमाण जास्त आहे.

महिलांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पाठवले जात असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अनेक आरोग्य केंद्रातून विविध आजाराने ग्रस्त व गरोदर महिलांना उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबाद येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रेफर करण्याचे प्रमाण चिंताजणक आहे, क्षमतेपेक्षा जास्त महिला उपचाराकरिता भरती होत असल्यामुळे फ्लोअर बेडची वेळ रुग्णांवर येते.

वर्षभर कोणत्याही परिस्थितीत तज्ञ डॉक्टरांचा चमू आपत्कालीन रुग्ण सेवा देतात परंतु क्षमतेपेक्षा जास्त महिला रुग्ण असल्यामुळे डॉक्टर, रुग्ण व नातेवाइकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. त्यामुळे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारल्यास घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात येणारा अधिकचा ताण तर कमी होणारच तसेच विविध आजारानेग्रस्त व प्रसूतीकरिता येणाऱ्या गरोदर महिलांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यास मदत होईल. याठिकाणी अद्यावत रुग्णालय बांधकामाकरिता जागा असुन, प्रवासासाठी विविध वाहने सुध्दा उपलब्ध असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!