उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुविधेची स्थिती सुधारण्याची आवश्यकता असून त्यासाठी जिल्ह्यात नवीन २९ आयुष्यमान रुग्णालय स्थापन करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेतली. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात मागण्याचे निवेदन दिले.
उस्मानाबाद जिल्हा भारत सरकारने घोषित केलेल्या जिल्हा नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत आहे. जिल्ह्यात आरोग्याची गैरसोय होत असून या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्याची गैरसोय व समस्या कमी करण्यासाठी आरोग्य सेवा सुधारण्याठी केंद्र सरकारने जिल्ह्यात नविन २९ आयुष्यमान रुग्णालये स्थापन करावीत. रुग्णालयासाठी आवश्यक असणारे उपकरणा बरोबरच कर्मचाऱ्यांना निवास करणे आवश्यक असल्याचेही खासदार राजेनिंबाळकर म्हणाले.
या सर्व सुविधांसाठी १५४५३.५४ लक्ष रुपयांचा आवश्यक निधी न देता २०२१-२२ मध्ये २०८८.४६ लक्ष रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही रक्कम त्या तुलनेत अत्यंत कमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्याची गैरसोय कमी करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यास देण्यात यावा, अशी मागणी देखील खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- ‘नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?’
- गडकरी घेणार धाडसी निर्णय; महापुरातही कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

