Share

मागितले होते काय अन मिळाले काय? आकृतीबंधावरुन औरंगाबाद पालिकेची घोर निराशा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेच्या बहुचर्चित आकृतिबंधाला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र यात महापालिकेने मागणी केलेल्या सुमारे चार हजार पदांना कात्री लावण्यात आली असून अवघ्या ९५३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीची ४७६३ पदे व नवीन ९५३ पदे अशी एकूण पाच हजार ७१६ एवढी राहणार आहेत. दरम्यान पदांना खात्री लावतांनाच काही पदांचा पे ग्रेड सुद्धा कमी करण्यात आल्याने अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

महापालिकेच्या आकृतीबंध आता विषय अनेक वर्षांपासून चर्चेत होता. शनिवारी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी लोकप्रतिनिधींनी देखील शहराचा वाढता व्याप पाहता महापालिकेत नोकर भरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे आकृतिबंध मंजूर करा अशी गळ शिंदे यांना घातली होती. आश्वासनानुसार सोमवारी आकृतिबंध मंजुरीचा अध्यादेश काढण्यात आला. त्यात म्हटले आहे महापालिकेचे आस्थापनेवर शासन मंजूर ३६ कार्यरत कर्मचारीनिहाय व्यपगत पदे वगळून यापूर्वीची मंजूर चार हजार ७६३ पदे व नवीन ९५३ पदे यांसह महापालिकेच्या एकूण पाच हजार ७१६ पदांच्या आकृतिबंधात मान्यता देण्यात येत आहे.

आकृतिबंधानुसार उपलब्ध होणारी पदे आवश्यकतेप्रमाणे महापालिकेचा आस्थापना खर्चाची ३५ टक्के मर्यादा लक्षात घेऊन भरण्यात यावी. यासाठी निधी किंवा अनुदान शासनाकडून महापालिकेला दिले जाणार नाही. आकृतिबंधात ९५३ पदांना मंजुरी देण्यात आली असली तरी ३६ पदे व्यापगत करण्यात आली आहे. त्यात टेलिफोन ऑपरेटर-९, संगणक प्रोग्रामर-१, अन्न सुरक्षा अधिकारी-१, एसएफडब्ल्यू-७, समूह संघटक- २,संगणक ऑपरेटर-४, जल निर्देशक (पुरुष), सहजलनिर्देशक – (पुरुष महिला) प्लांट ऑपरेटर १, जीवरक्षक-२, शिवणकला शिक्षिका, ड्रेसर-२ या पदांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!