जालना : उद्योग उभारणीसाठी कर्जरुपी घेतलेल्या पैशांची परतफेड करताना दमछाक झालेला तरूण उद्योजक सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाल्याची घटना समोर आलीये. संदीप दयानंद आर्सुड असे या 33 वर्षीय उद्दोजकाचे नाव आहे. ते औरंगाबाद येथील उस्मानपुरा भागातील रहिवाशी आहे. संदीप आर्सुड यांनी लिहिलेली सुसाईड नोट त्यांच्या पोलिसांनी पोलिसांकडे सुपुर्द केली आहे.
जालन्यातील नवीन मोंढ्याजवळ संदीप आर्सुड यांची फरसाणची कंपनी आहे. ही कंपनी उभारण्यासाठी त्यांनी जालन्यातील अनेक जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, या कर्जाची परतफेड करता येत नसल्याचे ते आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी सुसाइड नोट लिहून घर सोडले.
सुसाईड नोटमध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख
‘माझ्यावरचे कर्ज आणि व्यवसायात होणारे सततचे नुकसान आज रोजी पंधरा लाख रुपये आहे. लोकांच्या सततच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे. माझी मानसिक आणि आर्थिक परिस्थिती ठीक नाही. आई, पप्पा, रवीभाऊ आणि पत्नी ज्योती, मला माफ करा, मी पाच वर्षांपासून तुम्हाला खूप त्रास दिला. माझे स्वप्न होते की माझ्या कामामुळे मी सर्वांना खुश ठेवेन. पण तसे झाले नाही. मी कुठून आणणार तेवढे पैसे? आता माझ्यात क्षमता राहिली नाही. मी आता खूप थकलो आहे. माझ्याकडे सगळ्यांना देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. माझ्या घरच्यांना कुणीही त्रास देऊ नये.’
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण
- जालना जिल्ह्यासाठी २६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; ७९ कोटींचा वाढीव निधी
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये ‘जननायक’म्हणून गौरव
- रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या
- परभणीत पेट्रोलच्या दराने गाठली शंभरी, पॉवर पेट्रोल १०० रुपये ३७ पैसे प्रतिलिटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
