🕒 1 min read
मुंबई: जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली होती. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं होत.
दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत. यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.
आता या ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याचे धागेदोरे महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीडच्या शंतनु मुळुक या तरुणाचे नाव पोलिसांनी या प्रकरणात पुढे आणले आहे. शंतनु राहात असलेल्या बीडच्या घरी पोलीस तपास करण्यासाठी पोहोचले आहेत.
शंतनु हा सध्या फरार असून, त्याच्या आई वडिलांची चौकशी पोलीस करत आहेत. बीडच्या चाणक्यपुरीमध्ये राहणाऱ्या शंतनुने ते ‘गुगल टूलकिट’ बनवून आणखी दोघांनी ते एडिट केल्याचा आरोप आहे. शनिवारी झालेल्या दिशा रवी अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.
या आधी ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या अटकेचे प्रकरण ताजे असतानाच या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. दिशानंतर दिल्ली न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल निकिता जेकब यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. दरम्यान निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण
- जालना जिल्ह्यासाठी २६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; ७९ कोटींचा वाढीव निधी
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये ‘जननायक’म्हणून गौरव
- रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या
- परभणीत पेट्रोलच्या दराने गाठली शंभरी, पॉवर पेट्रोल १०० रुपये ३७ पैसे प्रतिलिटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
