मुंबई: आज (२० जून) विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काल शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शेरला सव्वाशेर मिळतोच’, असे म्हणत एकप्रकारे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. त्यामुळे आजची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे.
दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापर आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत.
दरम्यान कॉंग्रेसला दुसऱ्या जागेसाठी किमान ८ मते आवश्यक आहेत. भाजपला स्वतःचे संख्याबळ आणि सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचव्या जागेसाठी १८ मतांची गरज आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात होईल, तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs SA : भारताचं स्वप्न यावेळीही राहील अपूर्ण; निर्णायक सामना पावसामुळे रद्द
- IND vs SA : निर्णायक सामन्यात पावसाची पुन्हा एकदा एंट्री, खेळ थांबवला!
- अग्निपथ योजनेवर रवी किशन यांचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाले…
- शिवसेनेच्या बाण्यामुळे राणा पायाशी येतील – संजय राऊत
- आघाडीचे आमदार त्यांची नाराजी बुलेट आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्यक्त करतील – भागवत कराड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

