मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासभर चालली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. त्यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे.
राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली . राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झालं आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले. त्यामुळे या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राज्यातील सत्ताबदलनानंतर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यात नुकताच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.
महत्वाच्या बातम्या :
- Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाअंतर्गत कारवाई होणार? जाणून घ्या प्रकरण
- Ramdas Kadam । पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा बाळासाहेबांचे विचार आठवले नाहीत का?; कदमांचा ठाकरेंना टोला
- Dhananjay Munde | कोणतंही संकट माझी वाट अडवू शकत नाही ; धनंजय मुंडेंचे आक्रमक भाषण
- Ramdas Kadam । बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार? रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल
- Amol Mitkari | काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

