Share

“इंग्लंड भारतीय भूमीवरचा 9 वर्षांपूर्वी तो विक्रम पुन्हा करेल”

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या  कसोटी मालिकेसाठी भारतात पोहोचतो ना पोहोचतो तोच इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताला डिवचलं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बहारदार प्रदर्शन करण्यास टीम इंग्लंड सज्ज असून इंग्लंड भारतीय भूमीवरचा 9 वर्षांपूर्वी तो विक्रम पुन्हा करेल, असा विश्वास फ्लॉवर यांनी व्यक्त केलाय.

इंग्लंडने भारतीय भूमीवर भारतालाच 2012 साली पराभवाची धूळ चाखायला लावली होती. इंग्लंडच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठीमागे पूर्व प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याच विजयाची पुनरावृत्ती इंग्लंडचा संघ करु शकतो कारण यावेळीही टीममध्ये अव्वल खेळांडूंचा भरणा आहे, असं मत फ्लॉवर यांनी मांडलं आहे.

इंग्लंडच्या 2012 च्या विजयामध्ये ग्रॅमी स्वान आणि माँटी पनेसर या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या दहा दशकातील भारतीय भूमीवरील परदेशी संघातल्या मालिकेतला हा एकमेव विजय आहे.

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि इंग्लंडचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक असलेल्या फ्लावर्सने आगामी मालिकेविषयी भविष्यवाणी केलेली नसली तरी इंग्लंडचा संघात क्षमता असल्याने तसंच चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्याने तो मालिकेत चांगले प्रदर्शन करेल, असं ते म्हणाले.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!