🕒 1 min read
महाराष्ट्र देशा- बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत कोणाचे प्रेम कोणावर होईल काय सांगता येत नाही. गेली अनेक दिवस मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे दोघे लग्न करण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या फिरत होत्या. मात्र अर्जुनने ते दोघे लग्न का करत नाहीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
गेल्या वर्षभरापासून अर्जुन मलायकाला डेट करत आहे. ही जोडी विवाहबंधनात अडकणार अशा पुष्कळ बातम्या येत होत्या मात्र मे महिना संपत आला तरी अर्जुन- मलायकाच्या लग्नाची कोणतीच बातमी न अल्यानं अनेक जण अर्जुनला लग्नाविषयीच्या प्रश्नानं भंडावून सोडतात. या प्रश्नांचं अर्जुननं विनोदी उत्तर दिलं आहे. लग्न केल्यावर लोकांना टक्कल पडतं असं मिश्कील उत्तर त्यानं दिलं आहे. सध्या लग्न करण्याचा माझा विचार नाही असं तो ‘डेक्कन क्रोनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

