मुंबई : एन्काऊण्टर स्पेशलिस्ट असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्माएनआयएच्या रडारवर होते.
प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. थोडयाच वेळात त्यांना सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाईल.
मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसुख हिरेन आणि कार मायकल रोड प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी झाली होती. पण, एनआयएच्या ते कायम रडारवर होते. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती.एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत. त्यानंतर एनआयएच्या कारवाईला वेग आला आणि त्यानंतर प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’
- तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचे या’ चार जिल्ह्यांना संकेत
- सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
- कमाल झाली : पेट्रोलियम मंत्र्यांनी सामान्य जनतेवरच फोडले इंधन दरवाढीचे खापर !
- ‘लग्नाचा दिवस आयुष्यातील आजवरचा सर्वात चांगला दिवस’ ; सामन्यापूर्वी संजनानं घेतली बुमराहची मुलाखत


