Share

तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचे ‘या’ चार जिल्ह्यांना संकेत

Published On: 

मुंबई: राज्यात सध्या विविध भागात पाउसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेकाना पाऊसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र नुकतेच आता हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे.

मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह कोकणवासियांना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची काळजी घेत आपल्या कामाचे नियोजन करायला हवे. तसेच यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!