Share

‘साराने माझ्याकडे हात जोडून काम मागितलं’, रोहित शेट्टीचा खुलासा

Published On: 

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. साराने काही मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तरी देखील तिच्या उत्तम अभिनयायाने तिने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र एका कार्यक्रमात रोहित शेट्टीने तिच्या बाबत एक मोठा खुलासा केला आहे.

साराने रोहितकडे हात जोडून काम मागितलं असे त्याने सांगितले आहे. साराने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये रोहित शेट्टीनं साराची निवड कशी झाली याचा भन्नाट किस्सा सांगितला होता.

https://www.instagram.com/p/CPpw17_pJJq/?utm_source=ig_embed&ig_rid=150461f6-ff48-49a3-862f-76672d2cb7ba

‘काम करण्यासाठी सारानं मला खूप मेसेज केले, शेवटी कंटाळून मी तिला भेटायला बोलावलं. साराच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सेलिब्रिटी आहेत. ती स्टार किड आहे. त्यामुळे भेटायला येताना चार पाच बॉडीगार्ड, मॅनेजर असा लवाजमा घेऊन ती येईल असं मला वाटलं. मात्र ती एकटीच आली होती. ती एकटीच आली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला भेटायला आल्यावर अक्षरश: हात जोडून तिनं काम मागितलं, असे रोहित म्हणाला.

पुढे तो म्हणाला, सैफ अली खानची मुलगी असतानाही काम मिळवण्यासाठी ती करत असलेली धडपड मला खूप आवडली. तिला चित्रपटात काम द्या असं सांगायला मला सैफनं आणि अमृता सिंगनेही फोन केला नव्हता. तिनं काम मिळवण्यासाठी स्वत: धडपड केली हे मला खूप जास्त आवडलं असल्याचे हि यावेळी त्याने सांगितले आहे. त्यामुळे सध्या साराने स्वतःच्या हिम्मतीवर काम मिळवण्यासाठी केलेली मेहनत पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!