Share

फ्रेंच ओपन अंतिम फेरीत प्रवेश करताच ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास

Published On: 

मुंबई : पॅरीस येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत शुक्रवारी पुरुष उपांत्य फेरीच सामने पार पडले. यातील पहिल्या सामन्यात ग्रीसचा टेनीसपटु स्टिफानोस त्सित्सिपासने जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवला पराभुत केले. याविजयासह फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा तो पहिलाच ग्रीसचा टेनिसपटु ठरला.

उपांत्य फेरीच्या या सामन्यात स्टिफानोसने ऍलेक्झांडर झ्वेरेवला 5 सेटमध्ये पराभुत केले. स्टिफानोसने झ्वेरेवला 6-3, 6-3, 4-6, 4-6 आणि 6-3 अशा फरकाने पराभुत केले. ही लढत 3 तास 37 मिनिटे चालली होती. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर स्टिफानोसने सलग दोन सेट गमावले. मात्र अंतिम निर्णायक पाचव्या सेटमध्ये त्याने पुनरागमन करत 6-3 असा विजय मिळवला. स्टिफानोसचा कारकिर्दीत ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा त्याचा चौथा उपांत्य सामना होता. या सामन्यात विजय मिळवत पहिल्यांदाच त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

या ऐतीहासिक विजयानंतर 22 वर्षिय स्टिफानोस भावुक झाला होता. यावेळी त्याने बोलताना, ’मी खुप छोट्या भागातुन इथे आलो आहे. त्याचा विचार करता. मला कधी कल्पनाही केली नव्हती की, इथे येउन खेळू शकतो. माझे स्वप्न होते इथे खेळायचे आणि ते पुर्ण झाले.’ अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी तो भावुक झाला होता. स्टिफानोस हा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा 2008 नंतरचा सर्वात युवा टेनिसपटु ठरला आहे. अतिंम सामन्यात त्याला नोवाक जोकोविचचे अव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!