Share

राहुल गांधीचे अमेठी वासियांना भावनिक पत्र

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भावनिक पत्र लिहित अमेठी लोकसभा मतदार संघातील मतदारांना कॉंग्रेसलाच मतदान करा असे आवाहन केले आहे. अमेठी माझं कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीशी माझं भावनिक नातं आहे. असा आशय लिहित राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेला भावनिक साद घातली आहे.

या पत्रात राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. भाजप आता या निवडणुकीत पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहे. तसेच भाजपकडून या निवडणुकीत खोट्या लटक्या विकासाचा प्रचार केला जात आहे. तसेच या पत्रात राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या राफेलचा मुद्दा काढत पंतप्रधान मोदींना टोला मारला आहे. राफेल बाबत राहुल गांधी यांनी असे लिहिले आहे की, काँग्रेसची मालक जनता आहे. तर भाजपाचे मालक अनिल अंबानी आहेत. तसेच ‘काँग्रेस पक्ष गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. पण भाजपाला केवळ 15 ते 20 उद्योगपतींना सरकारचं मालक करायचं आहे.

दरम्यान अमेठी मधून या लोकसभा निवडणुकीत रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. अमेठी या कॉंग्रेसच्या पारंपारिक मतदार संघातून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून स्मृती इराणी यांना उतरवण्यात आल आहे. भाजप सरकारच्या काळात स्मृती इराणी यांनी अमेठी मध्ये विकास कामांचा धडाका लावत अमेठीमधील सुजाण जनतेच्या मनात जागा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमधून निवडणूक जिंकण काहीस जड जाणार असल्याच राजकीय तज्ञांकडून सांगितलं जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!