जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सातत्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शहरात कारवाईस सुरुवात केली आहे. बुधवारी विनाकारण फिरणाणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. दोन दिवसांत ३१४ पैकी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. जालना शहरातील मामा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुरुवारी सुद्धा शहरातील विविध भागांमध्ये अँटी जन टेस्ट करण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केल्या जात आहे.दरम्यान, विनाकारण रस्त्यावर फिरू नका. येणाऱ्या काळात विभागाच्या पथकासह जागोजागी अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. करुणा फैलाव रोखण्यासाठी घरातच सुरक्षित रहा, असे आवाहन सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मंडळींची होणार पंचाईत, जाणून घ्या नवी नियमावली
- ‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’
- राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक
- महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
- पाकिस्तानात आलिशान हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, चिनी राजदूताला मारण्याचा होता डाव ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

