Share

Election Result 2022 : पाच राज्यांचा आज होणार फैसला!

Published On: 

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा आज फैसला होणार आहे. उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यासह पंजाब (Punjab), गोवा (Goa), उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा फैसला काही तासातच होणार आहे. मात्र त्यापूर्वीच काही ठिकाणी आनंद साजरा करताना दिसून आले. उमेदवारांमध्ये आज प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात येथे 62.43 टक्के मतदान झाले. तर सातव्या टप्प्यात 46.40 टक्के मतदान झाले. तर मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 78.49 टक्के मतदान झालं.

दरम्यान गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यात 75.29 टक्के लोकांनी मतदान केले. तसेच पंजाबमध्येही 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. तर उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये 59.37 टक्के मतदान झाले आहे. आता या पाचही राज्यांचा निकाल थोड्यावेळात कळणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून काही क्षणांतच निकाल कळेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!