Share

“खेळ करण्यापेक्षा या महाकत्तलखान्याचे रचयिता कोण…”, आशिष शेलारांचा घणाघात

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत महाविकास आघाडीचा ‘महाकत्तलखाना’ असे म्हणत स्टिंग ऑपरेशन सभेत मांडले, मात्र त्यातील एका व्हिडिओवर 1/1/2019 ही तारीख असल्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल केला जात आहे. असे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. यावरच त्यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे.

“आरोपांना उत्तर नसले की असे खेळ खेळले जातात आणि दिशाभूल केली जाते. खेळ करण्यापेक्षा या महाकत्तलखान्याचे रचयिता कोण आणि प्रवीण चव्हाण यांचा दोर कुणाच्या हाती आहे, हे जाणून घेण्याची महाराष्ट्राला इच्छा आहे. त्यावर अधिक प्रकाश महाविकास आघाडीने टाकला तर बरे होईल.”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

तसेच वस्तुतः बहुतांश वेळी स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेरा सेटिंग आणि तारीख बदलली जाते, जेणेकरून कॅमेरा आणि व्यक्ती ओळखू येऊ नये. आता एका व्हिडिओमध्ये 1/1/1970 ही तारीख आहे, यादिवशी तर देवेंद्रजींचा जन्म सुद्धा झाला नव्हता. मग हे त्यापूर्वीचे स्टिंग म्हणणार का? असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!