Share

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी रणसंग्राम; भाजपने 5 तर आघाडीने उभे केले 6 उमेदवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक 20 जून रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ही निवडणूक राज्यसभेप्रमाणे गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. (विधानपरिषद) विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे आता निवडणूक निश्चित झाली आहे. भाजपने 5 उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीने ६ उमेदवार उभे केले आहेत.

विधानपरिषद बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस आपल्या एका उमेदवाराचे नाव मागे घेऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र काँग्रेसने तसे न केल्याने निवडणूक निश्चित झाली. भाजप समर्थक असलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नाव मागे घेतल्याने भाजपच्या वाटेतील अडचणी काहीशा कमी झाल्या आहेत.

भाजपने ज्या पाच उमेदवारांना उभे केले आहे त्यात विद्यमान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे.

नंबर गेम-

विधान परिषदेत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता असते. नंबर गेमचा विचार करता भाजपच्या चार उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित असून महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांचा विजय निश्चित आहे. मात्र भाजपने पाच तर आघाडीने सहा उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोन उमेदवार जिंकू शकतील. काँग्रेसला मित्रपक्ष राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा लागेल.

काँग्रेसला शिवसेनेच्या पाठिंब्याची जास्त गरज-

काँग्रेसकडे 44 आमदारांची मते आहेत. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवाराला 27 मते दिल्यानंतर 17 मते उरतात. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी 10 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे एकूण 169 मते आहेत, मात्र राष्ट्रवादीकडे 54 मते आहेत. उर्वरित मते शिवसेनेकडे आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला शिवसेनेच्या पाठिंब्याची जास्त गरज आहे. कारण त्यांच्या दोन्ही उमेदवारांना आवश्यक मते मिळाल्यानंतर अतिरिक्त मते शिवसेनेकडे आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!