Share

“मी जास्त बोलत नाही, पण विधान परिषेदेची पाचवी जागा जिंकणारच” ; फडणवीसांचा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी आवश्यक संख्याबळ नसूनही राज्यसभेचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा करिष्मा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसून येत आहे. “विधान परिषदेच्या पाच जागा आम्ही लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट आहे. त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवीये म्हणून आम्ही ५ वी जागा लढवतोय. त्याचे काही आराखडे तयार केले आहेत. हे सोपं नाहीये पणपरीशेदेक, आम्ही विधान परीषेदेची ५ वी जागा जिंकणारच”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अर्ज मागे घ्यायला शेवटचे अगदी पाच मिनिटांची वेळ शिल्लक असताना अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी पक्षात खूप मोठा अनरेस्ट आहे. त्यामुळे आम्ही पाचवी जागा लढवत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच मोठ्या प्रमाणात आम्हाला आमदार मदत करतील, असे फडणवीस म्हणाले.

“अपेक्षा अशी होती ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी तसा प्रयत्नही केला. पण ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आम्ही पाच जागा लढवतोय. पाचवी जागा लढवणं आणि जिंकून आणणं हे सोपं नाहीये. पण मला विश्वास की आम्ही पाचवी जागा जिंकणार”, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!