Share

राज्यातील ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर

Published On: 

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषद स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण ८ जागांचा कार्यकाळ संपुष्ठा आला असून त्यातील ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १० डिसेंबर रोजी मतमोजणी आणि १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील मुंबईतील २, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर या ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तर सोलापूर आणि अहमदनगर येथील दोन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसून लवकरच होण्याची शक्यता आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर ही निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडून १६ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!