कोल्हापूर : राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यापैकी शेकडो ग्रामपंचायत निवडणूक या गावाच्या परंपरा राखत तर काही ठिकाणी पहिल्यांदाच बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आलं होतं. ज्या ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या नाहीत त्या ग्रामपंचायतींमधील जागांवर आज राज्यभरात मतदान पार पडलं आहे.
यंदा गावाकडील ग्रामपंचायतींनी देखील ‘मॉडर्न पॅटर्न’ राबवल्याचं दिसून आलं. मतदानाची वेळ आता संपली असून उमेदवाराचं भवितव्य हे मतदानपेटीत बंद झालं आहे. सोमवारी म्हणजेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. आजच्या निवडणुकांमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी देखील समोर आल्या आहेत.
कोल्हापुर जिल्ह्यातील पेरीड या गावात एकाही ग्रामस्थाने मतदान केलेलं नाही. इतकंच काय तर निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराने देखील मतदान केलेलं नाही. पेरीड या गावात गेल्या ६५ वर्षांपासून निवडणूक लागली नव्हती. या गावातील ग्रामपंचायत ही बिनविरोध होत होती. यंदा देखील ९ पैकी ८ जागा या बिनविरोध झाल्या. मात्र, एका जागेवर दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
या वेळी देखील निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र, एका वॉर्डमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या उमेदवारांना देखील ग्रामस्थांसोबतच राहावेसे वाटले. त्यामुळे ग्रामस्थांसह या उमेदवारांनी देखील मतदान केलं नाही. यामध्ये निवडणूक आयोगाचा निधी व वेळ खर्च झाला असून जेव्हा पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, तेव्हा पुन्हा निवडणूक लागेल. यावेळी, ही जागा ग्रामस्थांना बिनविरोध करता येईल. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- तब्बल सहा तासांहून अधिक वेळ एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी, खडसे म्हणाले…
- सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; शरद पवारांची ठाम भूमिका
- आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला कॉंग्रेसची अनुपस्थिती
- राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !

