औरंगाबाद : महापालिका प्रशासनाकडून शहरात शनिवारी (दि.१६) विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमांचे निमंत्रण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आतापर्यंत मिळालेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारसोबत असताना स्थानिक नेत्यांना बाजूला सारले जात असल्याने महाविकास आघाडीत नाराजी दिसून येत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना व्यासपीठावर स्थान मिळाले नव्हते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांना यांना आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले , ‘ उद्या होणार्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला अजून मिळालेले नाही. निमंत्रणच नाही तर जायचे कसे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत प्रशासकीय राज आहे. आयुक्तांनी या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांना बोलावले आहे. शिवसेनेने मित्र पक्षातील माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रण द्यायला हवे होते.याविषयी पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करू ‘.
कॉंग्रेसचे माजी नगरसेवक तथा मनपाचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांना मनपाकडून रीतसर निमंत्रण मिळाले आहे. मात्र कॉंग्रेसचे नगरसेवक उद्या उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्या नागपूर याठिकाणी कॉंग्रेसचे शेतकरी कृषी कायद्याविरोधी भव्य आंदोलन आहे. सर्व माजी नगरसेवक त्याठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश
तब्बल सहा तासांहून अधिक वेळ एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी, खडसे म्हणाले…
मुंडे प्रकरणात भाजपचे सोयीचे राजकारण
देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांकडून मुंडेंची पाठराखण !
भंगार व्यापार्यास १९ लाखांचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
