Share

तब्बल सहा तासांहून अधिक वेळ एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी, खडसे म्हणाले…

Published On: 

मुंबई : मागील महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस बजावलेली आहे. एकनाथ खडसे यांना हजार राहण्यासंदर्भात तसे समन्स देखील बजावले होते. मात्र, ईडीकडे हजेरी लावण्याअगोदरच एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती देण्यात आली होती.

एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर, त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. ईडीने त्यांची मागणी मान्य केली होती. एकनाथ खडसे यांनी ईडीला सहकार्य करण्याचे काबुल केल्याप्रमाणे आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात हजर झाले होते.

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असं खुलं आव्हान देखील त्यांनी भाजपला दिलं होतं. मात्र, आज सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यानंतर, अर्ध्या तासाने त्यांच्या कन्या देखील ईडी कार्यालयात हजर झाल्याचे सांगण्यात आले होते सुमारे ६ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी ईडी मार्फत केली गेली असून ते ईडी कार्यालयाबाहेर पडले आहेत. ते म्हणाले, ‘ईडीला सांगितल्याप्रमाणे चौकशीसाठी मी ईडीला सहकार्य करणार आहे. ईडीच्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे मी दिली आहेत.’

काय आहे हे प्रकरण ?

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते, यावेळी त्यांना क्लिनचीट देखील देण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!