औरंंगाबाद : टँकरवर पाणी भरत असलेल्या वृध्देला चालकाने पाठीमागून धडक दिल्याने वृध्देचा मृत्यू झाला. हा अपघात १७ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बीडबायपास रोडवरील भीमवाडी येथे घडला.
शकुंतला श्याम कसबे (वय ६०, रा. मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा) असे मृत वृध्देचे नाव आहे. शकुंतला या झाल्टा फाटा ते केंब्रिज या रोडवरील भीमवाडी येथे टँकरचे पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. पाणी भरताना अचानक चालकाने शकुंतला यांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

