🕒 1 min read
मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा आज दोन ठिकाणी पार पडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवतीर्थावर, असे मेळावे पार पडले. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप – प्रत्यारोप केला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा कट्टाप्पा म्हणून उल्लेख केला होता. याला शिंदेंनी प्रत्युत्तर केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचा पलटवार :
मी रुग्णालयात असताना कट्टाप्पा कट करत होता, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे :
मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेले
- Uddhav Thackeray । महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला खरपूस समाचार! भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा…
- Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- CM Eknath Shinde | “… म्हणून पिएफआयच्या बंदीवर त्यांनी भमिका घेतली नाही”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
