मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिकेसी येथील मैदानावर आयोजीत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या बाप चोरण्याच्या टीकेला देखील एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”
भाषणातील महत्वाचे मुद्दे
- आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा.
- खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली.
- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PFI वर घेतलेले निर्णय योग्य आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलं आहे.
- आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान.
- शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक असलेल्या शिवसैनिकांना माझा नमस्कार. या विराट जनसमुदायला मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर मी नतमस्तक होतो. या जनसमुदायाने सिद्ध केलंय की शिवसेना कुणाची
- जरा विचार करा: तुमचे बंधू राज ठाकरे तुमच्या सोबत राहिले नाहीत. नारायण राणे सोडून गेले. स्मिता ठाकरे वाहिनी, निहार ठाकरे इथेच बसलेत. का बसलेत? आता तरी याचा विचार करा.
- तुम्हांला मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष पूर्ण करायची होती. शिवसेनेचे होत असलेले पानिपत तुम्ही पाहत बसला होतात.
- बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही
- एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते.
- 2.5 वर्ष का गप्प बसलो? आमच्या देवाचं अंश तुम्ही म्हणून शांत बसलो.
- रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही खिल्ली उडवता. त्यांनी जगामध्ये आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण केलीय. जगातल्या लोकांना त्यांनी भुरळ घातली आहे.
- काँग्रेस पक्ष आहे पण त्याला अध्यक्ष नाही, पंतप्रधानांची टिंगल करणाऱ्यांचं काय झालं?
- हे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे असं बाळसाहेब म्हणायचे.
- आता तुमच्याकडचे लाखो शिवसैनिक गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी मी पणा कायम आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.
- तुमचं work from home आणि आमचं work without home
- उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही.
- जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून,मी दुसऱ्याला मदत केली. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला नाही.
- बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजत होते. तुम्ही त्यांना घरगडी समजत होतात.
- नोकर के साथ क्यू जाते हो. मालिक के साथ आओ. असा फोन थापांना आला होता. अश्या पद्धतीने पक्ष नाही वाढत नाही.
- ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं.
- पूराच्या पाण्यातून जाऊन आम्ही पूरग्रस्तांना मदत दिली. असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अनेकांना मदत केली.
- अनेक पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तुम्ही त्याची दखल घेणार की नाही? असं असताना तुम्ही कुणाला सांभाळलं ते सांगा?
- दाऊद आणि याकुब मेनन चे हस्तक होण्यापेक्षा आम्हाला मोेदी शहांचे हस्तक व्हाय़ला केव्हाही आवडेल.
- महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेनं पुराच्या पाण्यात उडी मारली. डॉक्टर घाबरले पण मी त्यांना म्हटलं घाबरु नका, मी बुडालो तरी तुम्हाला बुडून देणार नाही.
- कटप्पा म्हणून ही टीका केली गेली. कटप्पा तर हा स्वाभिमानी, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता.
- तुम्ही म्हणता, भाजपने खंजीर खुपसला, तर शिवतीर्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत का शपथ घेतली. तेव्हा लाज वाटली नाही का?
- बीकेसीवर प्रचंड गर्दी झालीय, मला सांगितलं असतं तर काही माणसं शिवाजी पार्कात पाठवली असती.
- काहींनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार.
- दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली असं तुम्ही विचाराल असं वाटलं. पण तुम्ही मला आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी विचारली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- CM Eknath Shinde | “… म्हणून पिएफआयच्या बंदीवर त्यांनी भमिका घेतली नाही”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Uddhav Thackeray । देवेंद्रजी, आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुक्कर पाळायची, हे नाही चालणार; ठाकरेंचा इशारा
- Uddhav Thackeray | “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे गृहमंत्री, ते फक्त…” ; उद्धव ठाकरेंची टीका
- CM Eknath Shinde | “होय! गद्दारी झाली, २०१९ सालीच…”, एकनाथ शिंदे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

