Share

Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिकेसी येथील मैदानावर आयोजीत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला देखील एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”

२०१९ सालीच गद्दारी झाली-

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात भाषण देताना शिंदेंनी गद्दारीचं स्पष्टीकरण दिलं आहे. होय झाली गद्दारी, २०१९ सालीच गद्दारी झाली, जेव्हा महाविकास आघाडी घडली तेव्हाच गद्दारी झाली, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी यावेळी केला आहे.

आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा इशारा देखील शिंदेंनी दिला आहे. आम्ही नाही तर तुम्ही गद्दार आहात, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. तसेच मविआसोबत गेला तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली-

“खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!