मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावेळी भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेल्याची चर्चा आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील हा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे.
तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला-
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”
तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली-
“खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला खरपूस समाचार! भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा…
- Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- CM Eknath Shinde | “… म्हणून पिएफआयच्या बंदीवर त्यांनी भमिका घेतली नाही”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Uddhav Thackeray । देवेंद्रजी, आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुक्कर पाळायची, हे नाही चालणार; ठाकरेंचा इशारा


