Share

Eknath Shinde : मोठी बातमी : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असताना आता नवीन सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू झाली आहे. काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीमान्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.

संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शपथविधी सोहळा होणार आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले होते. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत पोहोचलेत.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!