मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे वृत्त समजते. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यांनतर यावर आता रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेत फुट पडल्यास भाजप अविश्वासाचा ठराव आणू शकते यावर प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, “आम्ही जोडण्याचे काम करतो, ते तोडण्याचे काम करतात. पाहूयात कोण जिंकत ते, आमचे नेते जसा आदेश देतील आम्ही तसं करू”. तसेच पुढे बोलताना त्यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचेही यावेळी सांगितले.
संजय राऊत काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत आणि ते शिवसेनेचे निष्ठावंत नेते असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणालेत. तसेच आमदारांची फसवणूक करून त्यांना नेलं जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ज्या क्षणी आमचा त्यांच्याशी संपर्क होईल तेव्हा एकनाथ शिंदे परत येतील असा विश्वास संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे”.
महत्वाच्या बातम्या –


