Share

Eknath Shinde Update : माध्यमांशी बोलू नका, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा शिवसेना आमदारांना आदेश

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे वृत्त समजते. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आदेश दिला आहे.

माध्यमांशी बोलू नका, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिला असल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याची माहिती होती. मात्र आता आमदारांसोबतच ठाकरे सरकारमधील ३ मंत्री देखील नॅाट रिचेबल असल्याचे कळत आहे. यामध्ये संदीपान भूमरे अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि स्वता एकनाथ शिंदे यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांची भेट झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असल्याने पुढे काय पहावे लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!