Share

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्या सोबत होते – संजय राऊत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे वृत्त समजते. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधलाय.

“एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत आणि ते शिवसेनेचे निष्ठावंत नेते असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणालेत. तसेच आमदारांची फसवणूक करून त्यांना नेलं जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ज्या क्षणी आमचा त्यांच्याशी संपर्क होईल तेव्हा एकनाथ शिंदे परत येतील असा विश्वास संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे”.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याची माहिती होती. आमदारांसोबतच ठाकरे सरकारमधील ३ मंत्री देखील नॅाट रिचेबल असल्याचे कळत आहे. यामध्ये संदीपान भूमरे अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि स्वता एकनाथ शिंदे यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. तसेच एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना माध्यमांशी बोलू नका असा आदेश दिला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!