मुंबई : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडी (Mahavikasaghadi) प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षापेक्षा नक्कीच प्रबळ होती. पण तरीही भारतीय जनता पक्षाने (bjp) संख्याबळानुसार चार उमेदवार जिंकून येण्याची शक्यता असतानाही पाचवा अतिरिक्त उमेदवार निवडून आणला. त्यामुळे भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून आले. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा (ravi rana) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
रवी राणा म्हणाले कि, पुढच्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी लवकरच अविश्वास ठराव आणणार आहोत. फडणवीस योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठरवा आणला जाईल. शिवसेना (shivsena) आणि काँग्रेसची (Congress) मतं फुटल्याचं समोर आलं आहे, असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे.
यानंतर पुढे बोलताना रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भगवान हनुमानाचा आशिर्वाद आहे. रावणाची लंका जाळण्यासाठी रामभक्त आणि हनुमानभक्त आमदारांच्या रुपात मैदानात उतरले आहेत. आधी आमदार धडा शिकवतील आणि मग जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असंही रवी राणा म्हणालेत.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सोमय्या ट्विटमध्ये म्हणालेत कि, विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा माफिया सरकारचे दिवस भरले आहेत असे देखील सोमय्या म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

