Share

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मां यांच्यावर पुण्यात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी काल २० जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह अजय देडे नामक व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 32 वर्षीय महिलेने अनैसर्गिक अत्याचार तसेच कौटुंबिक छळाची तक्रार केली असल्याने याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी करुणा शर्मा यांच्यावर कारवाई झाली असल्याचे समोर येत आहे.

या महिलेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा म्हणून करुणा शर्मांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या महिलेचा पती अजय कुमार याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक त्रास दिला असल्याची फिर्यादी महिलेने दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आता अडचणीत सापडल्या आहेत.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर अँट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद दिली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!