Share

Eknath shinde vs Sanjay Raut | “त्यांना स्वप्न पाहू द्या”; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरित्या सगळे निर्णय घेत आहे. मंत्रिमंडळ अजूनही स्थापन झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडून नक्की काय मिळवलं याचं आत्मचिंतन करावं लागेल. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरतील. दुसऱ्या पक्षात जाण्याची अनेक आमदारांची तयारी नाही. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”, असे राऊत म्हणाले होते. त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता शिंदे यांनी चांगलाच खोचक टोला लगावला आहे. शिंदे म्हणाले कि, “राज्यात सध्या 166 आमदारांचं सरकार आहे. तसेच 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलेले आहे. महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे मजबूत आहे. ते स्वप्न पाहत असतात आणि त्यांना स्वप्न पाहतच राहू द्या.” दरम्यान एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला.

एकीकडे शिवसेनेशी बंडखोरी करून राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री सध्या शिवसेनेच्याच जेष्ठ, अनुभवी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसात शिंदे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या भेटींमागे नक्की काय कारण आहे? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!