🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : विरोधकांकडून सत्ताधारकांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. तर ५० नाही तर २०० खोके देत असल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. शिंदे विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी, २०० खोके देण्यामागचा उद्देश देखील शिंदेंनी स्पष्ट केला आहे.
५० खोके देत नाहीत तर २०० खोके देतात, हे पैसे विकास कामांसाठी देतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, आज सकाळपासून आतापर्यंत २०० कोटीहून अधिक रुपयांची भूमीपूजनं आणि लोकार्पणं केली आहेत. १०० कोटी रुपये केवळ पाईपलाईन प्रकल्पासाठी खर्च झाले आहेत, असं स्प्षटीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
तसेच, हे सरकार केवळ अडीच-तीन महिन्यातच एवढी कामं करू शकते, तर पुढच्या दोन-सव्वा दोन वर्षात किती कामं करेल, यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा घणाघात देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दरम्यान, भंडारा येथे झालेल्या जाहीरसभेतून 50 खोके आरोपांचा चांगलाच समचार घेतला. गेल्या अडीच ते तीन महिन्यात आपल्या सरकारने अनेक विकासकामं केली आहेत. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश…”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प हातून गेल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- Jitendra Awhad | “राज ठाकरे यांनी माफी मागावी…”, जितेंद्र आव्हाडांचा पत्रकार परिषदेतून घणाघात
- Bipasha Basu Baby | आई झाल्यानंतर बिपाशाने केली पहिली पोस्ट, लेकीचं ठेवलं ‘हे’ नाव
- Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ गोष्टी करतील त्वचेला मॉइश्चरायझर
- Hair Care Tips | केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यापासून त्रस्त असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

