🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्याने सेना मोठ्या संकटात सापडली आहे. याचा धक्का महाविकास आघाडी सरकारलाही बसला आहे. शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक आमदार असून त्यांनी आसाममधील गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहेत. यावरच आता सुभाष साबणे (Subhash Sabne) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत सवाल केला आहे.
“काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले कि, मी त्या बोबडेंच्या बाजूला जाऊन बसू का? मात्र ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना अटक केली त्यांना जेल दाखवले त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता तुम्हाला ते चालते का? त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेचे १२ आमदार एक वर्ष विधान मंडळात निलंबित होतो. फक्त शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे. आजही शिवसेनाबद्दल माझ्या मनात नितांत प्रेम आहे.”, असे सुभाष साबणे यांनी म्हटले आहे.
“आज एकनाथ शिंदे जे माझे दैवत आहेत, त्यांनी बंड केले आहे त्याला सर्व शिवसैनिकांनी समर्थन करावे.”, असे आवाहनही सुभाष साबणे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “आम्ही मरू पण पार्टी सोडणार नाही” ; संजय राऊतांचं वक्तव्य
- Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाची ३ दिवसात धमाकेदार कमाई
- Sanjay Raut VS MNS : “बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर…”, संजय राऊतांचा टोला
- Alia- Ranbir : आलिया-रणबीर लवकरच होणार आई-बाबा; पोस्ट करत म्हणाली…
- Maratha Reservation : याच तळमळीने मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का? ; विनोद पाटील यांचा राज्यकर्त्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
