Share

Eknath Shinde | “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Published On: 

Eknath Shinde | सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

“देशात हेलिकॉप्टरने शेतात जाऊन शेती करणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत सवालही केला आहे. “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, “शिवप्रताप दिनाला येण्याचं मला निमंत्रण देण्यात आलं, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या निमित्ताने उंच भगवा ध्वज फडकवण्याची संधी मला मिळाली.”

तसेच त्यांनी प्रतापगडाच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपयांची निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरीवरही भाष्य केले. जनतेच्या जे मनात होते तेच आम्ही केलेले आहे. ज्यांनी ३७० कलम हटवले, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम केले त्यांच्याशी आम्ही युती केली असेही शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!