🕒 1 min read
Aditya Thackeray | मुंबई : मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विविध मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.
“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय,” अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत देखील शिंदे सरकारला सुनावलं.
“राज्यपाल ज्या पद्धतीने बोलले आहेत त्यावरुन खोके सरकारने परत पाठवलं पाहिजे होतं. पदमुक्त करायला हवं होतं. अजून तशी कोणतीही प्रतिक्रिया एकाही मंत्र्याकडून आलेली नाही. उलट त्यांचं वक्तव्य झाकावं म्हणून आणखी वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे यांना वाचवण्यासाठी असेल”, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
सध्याचं घटनाबाह्य सरकार असून मुख्यमंत्री देखील घटनाबाह्य आहेत. हे खोके सरकार आहे. या सरकारचा महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्लान आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत. प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा आव्हान दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात कोणता प्रकल्प येणार होता, त्याबाबतचे करार कधी झाले, कोणी प्रयत्न केले, या सर्वांबाबत मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर माझ्याशी चर्चा करावी, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Tukaram Mundhe | दबंग अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचा इतिहास, कुठे झाल्या बदल्या, बदल्यांचे कारण काय?
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना निरोगी आणि दाट बनवण्यासाठी करा आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sanjay Raut | “उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते…”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Mohommad Kaif | Live कॉमेंट्रीमध्ये मोहम्मद कैफने उडवली युजवेंद्र चहलची खिल्ली, म्हणाला…
- Atul Bhatkhalkar | “एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि…”; आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर भाजपाचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
