🕒 1 min read
मुंबई : राज्यात जवळपास सगळीकडेच अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीक आणि नुकतीच पेरणी केलेली बियाणं पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं मोठं संकट आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. या नुकसानग्रस्त शेकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त नागरिकांना निकष बाजूला सारून सर्वोतोपरी मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, इतकी मदत करण्यात आली असून बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांऐवजी 36 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टर करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना जवळपास दुपटीने मदत होईल. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील.” तसेच पुढे त्यांनी असेही सांगितले कि, “कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.
गोविंदांना विमा संरक्षण
दहीहंडी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. कोरोना काळात सॅन उत्सव उत्साहात साजरे करण्यात आले नसल्याने या वर्षी दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्यामुळेच अनेक गोविंदा पथकांनी सरकारकडे विम्याची मागणी केली होती. त्याची देखील सरकारने दाखल घेतली आहे. “गोविंदा पथकांची मागणी होती कि शासनाने विमा संरक्षण द्यावे. त्यांच्या या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहेत.”, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. .
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश, नितीन गडकरींना हटवले
- Supriya Sule । मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी करावी; सुप्रिया सुळेंची मागणी
- Manisha Kayande | एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मुंगेरीलालची स्वप्ने बनतील – मनीषा कायंदे
- Anil Bonde | “पापं केलेल्यांची धुग धुग वाढली असेल”; कंबोज यांच्या ट्विटवर बोंडे यांची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
