Share

मोठा खुलासा! धनंजय मुंडेंना आला होता ब्रेन स्ट्रोक

Published On: 

मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात दाखल असलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. धनंजय मुंडे यांची लिव इन पार्टनर करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक होण्यामागे कारणीभूत होती. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना अडकवण्याची धमकी दिली होती. धनंजय मुंडे यांच्याकडून सतत पैशांची वसुली सुरू होती. यामुळे ते खूप त्रस्त झाले होते, अशी माहिती समोर येत आहे.

रेणू शर्मा यांच्या विरोधात बळजबरीनं वसुली करण्याच्या आरोपाची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. क्राईम विभागानकडून रेणू शर्मा यांना २० एप्रिलला इंदूरहून ५ कोटीची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रेणू शर्मा यांच्याकडे उत्पन्नाचं कुठलंही दुसरं साधन नाही. परंतु तिच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराची नोंद झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात इंदूर मधील एका विकासकाचा जबाब नोंदवला आहे. याने सांगितले की, रेणूने फेब्रुवारीमध्ये नेपेनिया रोड, इंदूरवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे ५४.२ लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते. ड्युप्लेक्स वसुलीच्या पैशाने खरेदी केल्याचा दावा करत पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. यापूर्वी मुंडे यांनी हवालाद्वारे रेणूला ५० लाख आणि आयफोन दिल्याचे सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!