Share

ज्या प्रकरणात नाथाभाऊंच्या जावयाला ईडीनं अटक केली ते प्रकरण नेमके काय आहे ?

Published On: 

पुणे : ईडीनं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

या अटकेनंतर अनेक जणांच्या मनात हेभूखंड घोटाळा प्रकरण नेमके काय आहे असा सवाल उपस्थित होत असून आपण या लेखाच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.

रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव वाढला आहे. भाजपच्या नेत्यांनी भर सभागृहात तुमचा अनिल देशमुख करू अशी धमकीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली होती. अधिवेशन संपत नाही तेच एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन वादाचा अंक पाहण्यास मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!